Thinker आयुष्य एक संधी आहे

प्रिय वाचक,

आयुष्य ....!
आयुष्य एक संधी
नाही काही नवीन, नाही काही जुने.
ज्याला भेटते तो नशीबवान !
ज्याला जगता येते. त्यालाही नशीबवान म्हटले तर काही वावगं ठरणार नाही.
आयुष्य जसे जगायला शिकवते.
आयुष्य जगण्याचे गूढ सांगते.
आयुष्य सोपे नाही जितके ते दिसते.
आयुष्य अवघडही नाही जितके ते असते.
एक चक्रव्यूह असेल किंवा सरळ वाट, जी वाट आपल्याला घेऊन जाईल चांगल्या किंवा वाईट दुनियेकडे; पण तेही आपल्यालाच ठरवायचे आहे.
तसेच आपल्याला आयुष्यात सुख समाधान पाहिजे;
मग चांगली वाट धरल्याशिवाय कशी ख़ुशी मिळणार?.
तर मग चला; चांगली वाट धरा आणि ख़ुशी मिळवा.
हाच एक उपाय आहे आयुष्याची गुंतागुंत सोडवायचा,
हाच एक उपाय आहे जगण्याचे गूढ समजण्याचा.
आयुष्य..!
कधी कमी तर कधी जास्त मिळते तेही नशिबानेच;
पण नशीब घडवण्यासाठीच मिळते एक संधी.
ती संधी म्हणजे आयुष्य!
 

खुश राहा :-) सदा आनंदी राहा :-)

Thinker आयुष्य एक संधी आहे
#आयुष्य एक संधी आहे!

 

 

Post a Comment

0 Comments