Thinker आयुष्य हे संघर्षासारखे असते

प्रिय वाचक,


आयुष्य संघर्षमय आहे संघर्षा शिवाय मनुष्याचे जगणे कठीण आहे.
आयुष्यात लहानपणापासूनच संघर्ष करत आहोत,
आपल्या जन्माच्या वेळी आईने संघर्ष केला म्हणून आपल्याला हे जग पाहण्याची संधी मिळाली.
थोडं मोठं झाल्यावर आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
उभं राहिल्या नंतर आपल्याला चालण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
चालायला शिकताना आपला तोल संभाळण्या साठी संघर्ष करावा लागतो.
मोठं झाल्यावर चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्याचबरोबर आपल्याला आपल्या परिवाराशी ताळमेळ साधण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
सद्ज्ञान झाल्यावर आपले भविष्य घडवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
आपली कारकीर्द घडवल्या नंतर आपले शेवटचे काही वर्ष सुखात आणि आनंदात घालवण्यासाठीही संघर्ष करावा लागतोच; ते काही सहजरित्या मिळत नाही.
म्हणून आयुष्य हे संघर्षमय आहे.

हसत राहा :-) खुश राहा :-)


Thinker आयुष्य हे संघर्षासारखे असते
#आयुष्यहेसंघर्षासारखेअसते


Post a Comment

0 Comments