प्रिय वाचक,
आयुष्य वनस्पतींसारखे असावे.
झाडांसारखी माणसांची देण्याची प्रवृत्ती असावी ना कि सारखे घेण्याची,
झाडे जसे ऑक्सिजन देऊन सजीवांना जिवंत ठेवण्याचे काम करतात तसेच मनुष्यानेही तसे काहीतरी परोपकार करावे.
जर एखादा भुकेला असेल तर त्याला जेवण द्यावे.
जर एखादा तहानलेला असेल तर त्याची तहान शांत करावी
जर एखादा दुःखात असेल तर त्याला धीर द्यावा.
जर एखादा अडचणीत सापडला असेल तर त्याला मदत करावी.
जर एखाद्याला सोबतीची गरज असेल तर त्याचा आधार बनावे.
जर आपण सर्वांनी वनस्पतीं सारखी देण्याची प्रवृत्ती ठेवली तर आपले जीवन खरोखरच सार्थकी ठरेल.
आयुष्य वनस्पतींसारखे असावे.
हसत राहा :-) खुश राहा :-)
![]() |
#आयुष्यवनस्पतींसारखेअसावे |
0 Comments