Thinker आयुष्य हे उर्जे सारखं आहे

प्रिय वाचक,

आयुष्य हे उर्जे सारखं आहे
जसे ऊर्जेशिवाय जीव-जंतू  , पशु-पक्षी, तसेच इतर सजीव जगू शकत नाहीत तसेच मनुष्यही  ऊर्जेशिवाय परिपूर्ण नाही.
दोन अणूंच्या घर्षणाने निर्माण होते ती ऊर्जा
मनुष्याच्या एकमेकांच्या स्पर्शून निर्माण होते ती ऊर्जा
जसे मैत्रीत, प्रेमात आणि नात्यात जवळीक आली तसेच जिवलग मित्र, घरचे, आणि नातेवाईक एकत्र आले कि एक वेगळीच उमेद निर्माण होते त्या उमेदीचा ऊर्जेत बदल होऊन मनुष्याला आनंदी आणि समाधानी झाल्यासारख वाटत.
सकारात्मक विचार ठेवल्यास कितीही संकटे आली तरी आपल्यातल्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपण त्यावर मात करू शकतो
सगळ्या सजीवांना आपले अस्तित्व राखून ठेवण्यासाठी ऊर्जेची गरज भासते
ऊर्जेची गरज सजीवांसारखी झाडांनाही आहे त्यांना ऊर्जा सूर्य पासून मिळते
मनाचं आणि शरीराचं काम करण्यासाठी ऊर्जा अत्यावश्यक आहेजसे आपण आपल्या मानतील विचार; जे विचार आपण रोज करतच असतो; तेच विचार ह्या ब्रह्मांडात ऊर्जेच्या रूपात सोडले जातात.
आत्मा आध्यात्मिक ऊर्जा आहे, आणि ब्रह्मांडात भौतिक ऊर्जा आहे.
म्हणून आयुष्य हे  उर्जे सारखं आहे. 
 
 
हसत राहा ..! जगत राहा ..!
 
Thinker आयुष्य हे उर्जे सारखं आहे
#आयुष्यहेउर्जेसारखंआहे
 
 

Post a Comment

0 Comments