Thinker आयुष्य वेळेसारखे आहे !

प्रिय वाचक,

आयुष्य हे वेळेसारखं असतं
आयुष्य कसे असावे ?
आयुष्य किती असावे ?
आयुष्यातील मधील काळ .. !
हे सर्वकाही ठरवायचे काम वेळ  करते.
आयुष्यात वेळ हि अत्यंत महत्वाची आहे.
आयुष्य कमी पडेल पण वेळ अजरामर आहे...!
वेळेशिवाय आयुष्य जगू शकत नाही.
आयुष्यात चांगल्या गोष्टी कधी येणार? किंवा आयुष्यात वाईट वेळ कधी येणार?
हे हि वेळच ठरवते आणि ठरवू शकते व नंतरही ठरवत राहणार.
कधी कोणावर चांगली किंवा वाईट वेळ येईल,  कोणीही सांगू शकत नाही.
वेळे आधी आणि वेळे नंतर कुठलीही गोष्ट  होत नाही आणि होणारही नाही.
वेळेची किंमत कोणाला मोजता येत नाही!
वेळेची गम्मत कोणाला सांगता येणार नाही!
वेळेला पैश्यांपेक्षा जास्त किंमत आहे; कारण वेळ हि अशी गोष्ट आहे जी आपण विकत घेऊ शकत  नाही.
वेळ हि  माणसाला  खूप काही  शिकवून जाते.
वेळ हि  माणसाला खूप चांगल्या आणि वाईट दोन्ही अनुभव देऊन जाते.
ज्याची वेळ चांगली त्याचे कल्याण व्हायला वेळ नाही लागट;  आणि ज्याची वेळ वाईट त्याचा विनाश व्हायला वेळ नाही लागत.
म्हणून वेळेला महत्व द्या ! वेळेची इज्जत करा !
आयुष्य वेळेसारखे आहे !
 
हसत राहा ..! जगत राहा ..!
 
Thinker Life like time
#आयुष्यवेळेसारखेआहे!
 

Post a Comment

0 Comments