Thinker जीवनात कधीतरी अपानास्पद वागणूक मिळते

प्रिय वाचक,

जीवनात कधीतरी अपानास्पद वागणूक मिळते.
ती अपमानास्पद वागणूक मिळते तेव्हा आपल्याला त्यातून काही शिकता येतं,
कि त्या वागणुकी मागचे कारण आपल्याला शोधायला हवं.
मग आपल्याला आपली चूक कळेल म्हणजे आपण काय चुकलो, कि समोरच्याने आपल्याला अशी अपमानास्पद वागणूक दिली.
त्या  झालेल्या चुकीमुळे आपलयाला जे वाईट बोलणं ऐकावं लागले ,
त्यात  त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा,
ती झालेली चूक कशी झाली?
ती चूक समजून कशी सुधारावी?
ती चुक पुन्हा होऊ नये त्याचा आपल्याला प्रयत्न करावं लागेल आणि ती चूक सुधारून ज्याने आपल्याला ती अपमानास्पद वागणूक दिली होती, त्याला त्याच्या झालेल्या चुकीचा पश्चाताप झाला पाहिजे.
असे करून आपल्याला ती चूक सुधारल्याने आनंद तर होईलच आणि त्या चुकीबद्दल ज्या व्यक्तीने आपल्याला जी वाईट वागणूक दिली होती, त्यालाही आपल्याकडून एखाद्याला कधीही अशी अपमानास्पद वागणूक देऊ नये हा धडा मिळेल .
आपली चूक सुधारल्यामुळे आपण समाधानी झालो आणि ज्याने आपला अपमान केला होता त्यालाही आपल्या चुकीची जाणीव झाली.
त्यापुढे आता तोहि कोणाचा अपमान करण्याआधी विचार करेल आणि कोणाचे असे मन दुखावणे चांगले नाही हे हि त्याला कळेल.
कधी कधी आयुष्यात अपमानास्पद वागणूक मिळाली तर रागावू नका. 
शांत राहा.
त्या बद्दल विचार करा.
आणि ती चूक सुधारून आपण आपल्याला आयुष्यात येणाऱ्या चांगल्या - वाईट गोष्टींना तोंड देण्यासाठी खंबीर बनवा.

हसत राहा :-) खुश राहा :-)

Thinker Mistake Correction
#Thinkerजीवनातकधीतरीअपानास्पदवागणूकमिळते

Post a Comment

2 Comments